Pages

ज्ञानरचनावाद,खेळातून शिक्षण व एकात्म शिक्षण

                                             ज्ञानरचनावाद,खेळातून शिक्षण व एकात्म शिक्षण :-
                                    जन्मापासूनच मुल खेळकर असतात जसजसी मोठी होतात तशी ती आपल्या आपल्या आवतीभोवतीच्या वस्तू,माणसं,प्राणी,निसर्ग,प्रत्येक घटना जाणून घेण्यास उत्सुक असतात.सतत प्रश्न विचारत राहतात.अनोखे हटट करतात उदा.त्यांना टिव्हीत जायच असतं तिथल खेळण हव असतं कारण त्यांना त्याच गोष्टीच ज्ञान नसतं या वस्तू त्यांना हाथळायला मिळाल्या की त्यांची ओळख होते/माहिती होते.शाळेत दाखल होईपर्यंत रोजच्या जीवनातल्या त्यांच्याशी संबधित गोष्टीची जुजबी माहिती त्यांना होते. त्यामाहितीच्या आधारेच त्यांना स्वताःत्या वस्तूची चित्र ,प्रतिकृती पाहायला मिळाली की ती आनंदी होतात.नाव माहित असतच त्याच रुप/लिपी/शब्द स्वरुपही माहित होत असते.अनेक शब्द त्यातील अक्षर यांची रूपडी त्यांना समजतात.ही  अक्षर उलटसुलट पुढमाग करून ती स्वतः वेगवेगळया शब्दांची रचना करु लागतात.हाच ओघ ज्ञानरचनावाद तसेच अंकज्ञानाचीही रचना करते.खेळत त्यांना हे अलगद समजते.भाषा, गणिताची मूलभूत कौशल्य अशाप्रकारे मुल स्वतः शिकते.यासाठीच भाषिक व गणिती खेळ अत्यंत उपयोगी पडतात.त्यांची उदा.पुढे दिली आहेत.बाजारासारख्या खेळातून गणिताबरोबरच परिसराचा अभ्यास होतो.लोकांशी कसे बोलावे हे ही कळते. शाब्दिक उदाहरणात भाषेचेही शिक्षण होते.आपल्या जीवनउपयोगी कोणताही एक शब्द घेतला तरी त्याच्याशी निगडीत अनेक बाबींची माहिती विदयार्थी स्वतःशिकतात.

     उदा.रंग- रंगाची नावे ,भाषा प-अ,वर्गीकरण
रंगाची संख्या -गणित,संख्या
नैसर्गिक रंग – परिसर अभ्यास,पर्यावरण
रंगाचा वापर -राष्ट्रीय ध्वज,गणवेश,व्यवसाय,गणित,भाषा.
अध्ययन अनुभव देताना शिक्षकांनी ज्ञानरचनावादाबरोबरच क्रियात्मक शिक्षणाचा विचार करुन मुलाला केद्रस्थानीच ठेवल्यास हसत खेळत मुल प्रगतीचा टप्पा कधी गाठतात कळत नाही.त्यांच्या बरोबर आपलाही दिवस आनंदात अािण तणाव मुक्त जातो.आणि पुन्हा लहानपण अनुभवता येते.

    तालुक्यात यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन केले आहे.

1)100 टक्के शाळांमध्ये ज्ञानरचनावाद कृतीयुक्त अध्यापन खेळातून शिक्षण
2) उपक्रमशिल शिक्षकामार्फत तालुकास्तरावर ज्ञानरचनावादीसाहित्य तयार करणे.
3)शाळास्तरावर बाजार, विज्ञान जत्रा,शैक्षणिक साहित्य प्रदर्शन,भोंडला बालआनंद मेळावा इ.
धन्यवाद !!!

No comments:

Post a Comment