Pages

शाळा सिद्धी

 शाळा सिद्धी

राज्यातील १०० टक्के शाळा समृद्ध व्हाव्यात व शिक्षण हक्क कायदा २००९ ची संपूर्ण अंमलबजावणी व्हावी याची काळजी राज्य शासन घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळांची मानके व मुल्यमापनाकरीता शाळा सिध्दी मानके व मुल्यमापनाकरीता शाळा सिद्धी हा राष्ट्रीय कार्यक्रम समृद्ध शाळा २०१६ या नावाने येत्या शैक्षणिक सत्रात राबविण्यात येणार आहे.
राज्यातील १०० टक्के शाळा एसएस २०१६ प्रमाणपत्रधारक होण्याचे उद्दीष्ट असल्याने सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम व सर्व बोर्डाच्या शाळांनी दरवर्षी स्वयंमुल्यमापन करावे व निकष पूर्तीचा आत्मविश्वास येईल तेव्हा विद्या परिषद पुणे यांच्याकडे अर्ज करून एक महिन्याच्या आत संबंधित शाळेचे मुल्यमापन व मानांकन करावयाचे आहे. शाळा मुल्यमापनाचा हा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवरून सुरू झालेला असल्यामुळे राज्यातील यापूर्वी सुरू असलेले शाळा मुल्यमापनाचे सर्व कार्यक्रम या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात येत आहेत, असे शासन आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

शाळा सिद्धी शासन निर्णय (GR ) डाउनलोड करण्यासाठी येथे click करा .
  डालो

शाळा सिद्धी माहिती विषयी ची ppt  डाउनलोड करण्यासाठी येथे click करा .

डालो 

धन्यवाद !!!

No comments:

Post a Comment