Pages

भाषा विकास

भाषा विकास
             प्रत्येक मुलाच्या जीवनात माता आणि मातृभूमी यांचे असाधारण महत्व असते. माता मुलांना भाषा देते, तर मातृभूमी  (विशिष्ट भूभागावर वास्तव्य करणारा समाज) सांस्कृतिक वारसा देते. भाषा मुलांना त्यंाच्या गरजा, इच्छा, भावना, कल्पना, विचार व्यक्त करायला ,इतरांना समजून घ्यायला मदत करते. त्यामुळे त्यांचे सामाजिक समायोजन सुलभ होते. कुटूंबाकडून आणि समाजाकडून मिळणारा सांस्क्रुतिक वारसा मुलांचे व्यक्तीमत्व समृध्द करतो. मुलांच्या सामाजिक समायोजनाला आणि व्यक्तीमत्वाच्या विकसनाला मदत करणे हे भाषा शिक्षणाचे ध्येय मानले आहे.थेाडक्यात भाषा म्हणजे जीवन. मूल समजण्यासाठी त्याला आपलेसे करण्यासाठी मातृभाषेसारखे दुसरे साधन नाही.
              रूसलेलं मूल हसवायला
              हसणारं मूल रमवायला
              रमलेलं मूल खेळायला
              खेळणारं मूल शाळेच्या रंगात रंगून जायला
              हवी  असते भाषा “ मातृभाषा ”.


1)                  मराठी ही मातृभाषा (प्रथम भाषा ) असल्याने ती समृध्द होण्यासाठी प्राािमिक स्तरापासूनच प्रयत्न करण्यासाठी या गटात खालील उपक्रम घेण्याचे नियोजन आहे.
2)    भाषा शिक्षक मंडळ स्थापन करून त्रैमासिक कार्यशाळा घेणे.
3)    केंद्रस्तरावर शिक्षकांनी तयार केलेल्या भाषिक खेळावरून पुस्तिका विकसन व प्रत्यक्ष उपयोग.
4)    परराज्यातील, फासेपारधी ,नंदीवाले इ.अमराठी मातृभाषा असलेल्या विदयार्थ्यांना नियमित मराठी भाषा शिकविण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करणे.
5)    शाळा,केंद्र,तालुकास्तरावर कथाकथन , हस्ताक्षर ,निबंध ,वक्तृत्व,हस्तलिखीत इ.स्पर्धा.
6)    प्रकट वाचन,चावडी वाचन, मुलाखत इ.
7)    तालुकास्तरावर साहित्य संम्मेलन, ग्रंथमहोत्सवाचे आयोजन.
8)    (भाषिक खेळ (उदा.-कथाकथन,अभिनय,स्मरणावर आधारीत खेळ,शब्दकोडी)

विविध उपक्रम :-
                  1) चित्रवर्णन
                 2) शब्दावरून गोष्ट वर्णन
                 3) शब्दांचा डोंगर –(मूळ शब्द न बदलता वाक्य तयार करत जाणे.)
                 4) शब्दांची मालगाडी –(शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून शब्दनिर्मिती करत जाणे.)
                 5) संग्रह- (म्हणी,वाक्प्रचार,समानार्थी शब्द,विरूध्दार्थी शब्द इ.)
                 6) कविता व बडबडगीते हावभावयूक्त म्हणून घेणे.                  

7)    शब्दातून शब्दाकडे- या उपक्रमातून विदयार्थ्यांना शब्दनिर्मिती करण्यास संधी उपलब्ध होऊन शब्दसंपत्तीत भर पडते. (उदा. वास-सुवास-निवास-प्रवास)
8)    चढत्या क्रमाने अनेक अक्षरी शब्द सांगणे-मुलांना एक अक्षर सांगणे त्यापासून एक-दोन-तीन-चार व पाच अक्षरी शब्द तयार करणे. (उदा.न-ने-नळ-नेहमी-नियमित-निवडणूक)
9)    शब्दाकडून सृष्टीकडे- दिलेल्या अक्षरावरून विविध स्वरचिन्हयुक्त शब्दांची साखळी तयार करणे.(उदा.म-मध, मा-माकड-मैना-मोसंबी -इ.)
10)    शब्दजिना-एकाच व्यंजनाला स्वरचिन्हे लावून शब्द तयार करणे.
11)    (उदा.प-पट-पाट-पिवळी-पीळ-पुरण-पूजा-पेठ-पैसा-पोट-पंप)
धन्यवाद !!!

               

No comments:

Post a Comment