Pages

समावेशित शिक्षण

                                                               ¤ समावेशित शिक्षण ¤
              
                                                 व्यंग नव्हे कमतरता, माझ्यातही आहे क्षमता.
              खंडाळा तालुक्यात अतितीव्र व तीव्र अपंगत्व असलेल्या दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र डे-केअर सेंटर आहे.सौम्य प्रवर्गातील प्राथमिक शाळांमध्ये सर्वसाधारण मुलांबरोबर ही मुले शिकत असतात.शिक्षकांना त्या मुलांबरोबर जवळीक निर्माण करण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात.
               दिव्यांग बालकांची मानसिकता विचारात घेवून वैयक्तिक पातळीवर वेगवेगळया कल्युप्त्यांचा अवलंब करावा लागतो.त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार विविध अध्यापन पध्दती, तंत्रपध्दती व प्रोत्साहनाचा वापर करावा लागतो.यामुलांची शारिरीक व मानसिक क्षमता ही नाजूक असते.हे लक्षात घेवून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत वै'कीय शिबीरे,उपचार सुविधा,साहित्य साधने व आवश्यक थेरपी दिल्या जातात.यामुलांना अध्ययन अध्यापनासाठी विशेष तज्ज्ञ व फिरता विशेष शिक्षक  यांचेकडून या विषयीची माहिती घेवून दिव्यांग विदयार्थ्यांना फायदा मिळवून दिला जातो.त्यांचे मुल्यमापन करताना या शिक्षकांची मदत होते.   
•                       दिव्यांग विशेष गरजा असणा-या बालकांचे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या दृष्टीने गूणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण पूर्ण करताना कोणतेही अडथळे निर्माण होवू नयेत. दिव्यांग बालकांना वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत सुयोग्य व संचारमुक्त वातावरणात शिक्षणाची समान संधी देऊन मूख्य प्रवाहात आणणे व प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे ही आपली सामुहीक जबाबदारी आहे.
1.    गटात वर्षभरात राबविणेचे नाविण्यपूर्ण उपक्रम :-
2.    दिव्यांग विदयार्थी खेळ,संगीत,नाटयीकरण यांचा विकास करणे.
3.    दिव्यांग मुली शिक्षण व समुपदेशन व पालक मार्गदर्शन शिबीर.
4.    विविध दिव्यांग क्षेत्रातील दिनविशेष , अपंग सप्ताह साजरा करणे.
5.    सर्व प्राथमिक शिक्षकांना दिव्यांग बालकांविषयीचे प्रशिक्षण देणे.
6.    दिव्यांग बालकांना तालुकास्तरावर वैविध्यपूर्ण व्यवसाय पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
7.    दिव्यांग मुलांची शाळास्तरावर केसस्टडी करुन गुणवत्ता वाढीसाठी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी    करणे.
8.    दिव्यांग मुलांचा व त्यांच्या पालकांचा गौरव उपक्रम राबविणे.
तालुक्यात स्पीच थेरपी सेंटरची उभारणी करणे.
धन्यवाद !!!

No comments:

Post a Comment