Pages

7-Pay

7 वा वेतन आयोग 
  हजारो कर्मचा-यांची ७ वा वेतन नि‍श्चिती केवळ ५ मिनीटात शक्‍य...... ?
           महाराष्‍ट्रातील शासकीय कर्मचा-याना ७वा वेतन आयोग लागु झालेला आहे. तसेच माहे मार्च वेतन ७वा वेतन आयोगानुसार काढण्‍यासाठी प्रत्‍येक कार्यालयात तयारी चालु आहे. वेतन नेमका किती वाढला याची उत्‍सुकता देखील प्रत्‍येक कर्मचा-याला आहे. अशात रोज Whats app वर ७ वा वेतन निश्चिती संदर्भात अनेक मेसेज फिरत आहेत वेगवेगळ्या प्रकारे calculations केला जात आहे. कोणता विकल्‍प भरावा ? कोणता विकल्‍प भरल्‍यास किती फायदा होणार आहे. अशाप्रकारे असंख्‍य प्रश्‍न प्रत्‍येकाला पडलेला आहे.
       या सर्व प्रश्‍नावर तोडगा काढण्‍यासाठी श्री.सोमनाथ गायकवाड सर यांनी  Excel मध्‍ये एक File तयार केलेला आहे. या file च्‍या सहाय्याने केवळ पाचच मिनीटात हजारो कर्मचा-यांची ७ वेतन आयोेेगाप्रमाणे वेतन निश्चिती करता येते. समजा एका तालुक्‍यात १२०० शिक्षक आहेत असे समजू.... १२०० शिक्षकांची वेतन निश्चिती केवळ ५ मिनीटात होईल. यासाठी आपल्‍याजवळ सर्व शिक्षकांची प्राथमिक माहीती असणे आवश्‍यक आहे. उदा. शिक्षकाचे पूर्ण नाव, पद, शाळा, दिनांक १/१/२०१६ ची बेसिक, ग्रेड पे बस्‍स एवढा माहीती Excel Sheet मध्‍यो उपलब्‍ध असेल तर ५ मिनीट देखील वेळ लागणार नाही.

         सदर Excel File मध्‍ये नेमका काय तयार होईल व कसे काम करेल ? 

या फाईलमध्‍ये कांही प्राथमिक माहीती भरल्‍यानंतर Bulk व्‍दारे हजारो कर्मचा-यांची वेतन निश्चिती तयार होते.
यामध्‍ये प्रामुख्‍याने.....
१. प्रत्‍येकाचे विकल्‍प
२. प्रत्‍येकाचे वचन पत्र
३. १/२/३/४ महिन्‍याचे वेतन फरक तक्‍ता
४ दिनांक ०१/०१/२०१६ ते दि.३१/१२/२०१८ पर्यंत फरक तक्‍ता (प्रत्‍येकी )
५. वेतन वाढ तक्‍ता
६. माहे जानेवारी / फेब्रुवारी / मार्च महीन्‍याचा पे बील (2/3 फरकासह)
७. एकाच क्लिकमध्‍ये जेवढे कर्मचारी तेवढे सर्व तक्‍ते PDF मध्‍ये तयार होतील.

file डाउनलोड करण्यासाठी येथे click करा.      7-Pay File

Kokila font मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे click करा.    7-Pay File-kokila-font 

No comments:

Post a Comment