Pages

निर्वर्ग अध्यापन

निर्वर्ग अध्यापन
          विदयार्थ्यांचा 100 टक्के शैक्षणिक विकास साध्य करण्यासाठी विविध अध्यापन पध्दतींचा अवलंब शिक्षकांना करावा लागतो. व्दिशिक्षकी शाळेमध्ये किंवा तीन शिक्षकी शाळा व पाच वर्ग अथवा शिक्षक रजेवर असेल अशा ठिकाणी अध्ययन व अध्यापनाचे सुक्ष्म नियोजन शिक्षकांना करावे लागते. निर्वर्ग अध्यापन पध्दतीचा उत्कृष्ट वापर केल्यास शिक्षकांना चांगल्याप्रकारे अध्यापनाचे नियोजन करता येईल. या अध्यापन पध्दतीमध्ये विदयार्थ्यांचे बौध्दिक स्तर विचारात घेऊन गट करावेत व त्या गटांना त्यांच्या क्षमतेनुसार विषयातल्या उपघटकाचे काम पूर्ण करण्यास सांगावे. या विदयार्थी गटांना विशिष्ट नाव दिल्यास अजून आपले काम सोपे होऊ शकते.
                 सद्यपरिस्थितीत शाळाबाहय मुलांना वयानुरूप त्या-त्या इयत्तेत प्रवेश दिला जातो.काही मुले इतर काही कारणांमुळे अप्रगत राहतात. काही मुलांचा बौध्दीक स्तर चांगला असल्यामुळे त्यांना चांगले आकलन होते.ही मुले वर्गाचे व गटाचे नेतृत्व करू शकतात.त्यामुळे सर्वच मुलांना त्यांच्या क्षमतेने कौशल्य प्राप्त करून प्रगत होण्यासाठी निर्वर्ग अध्यापन पध्दत उपयोगी पडते.
 कार्यपध्दती-
             स्तरनिहाय गटामध्ये मुलांना बसविणे. भाषा व गणिताची जी कौशल्य प्राप्त करावयाची आहेत त्यासाठी शैक्षणिक अध्ययन अनुभव देणे. ही मुले गटात स्वतः साहीत्य हाताळतील त्यावरील शब्द ,अक्षर ,अंक इ.बाबत माहिती मिळवतील.  त्यानुसार स्वतः अक्षर व शब्द ओळखतील ,संख्याज्ञान होईल. गटामध्ये बौध्दिक स्तर चांगला असलेला विदयार्थी गटाचे नेतृत्व करील. उच्च बौध्दिक स्तर असलेल्या गटातील मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार उच्च कौशल्य/प्रभुत्व मिळविण्यासाठी योग्य ते अध्ययन अनुभव दयावेत त्यासाठी आवश्यक सुविधा/साहित्य उपलब्ध करून दयावे.उदा. चित्रावरून गोष्ट,प्रसंगवर्णन, नोटा व नाणी यावरून संख्या व संख्यास्थान ओळखणे इ.
   भाषा व गणित विषयानुसार शाळेतील सर्व वर्गांची स्तरनिश्चिती करणे.(उदा.-भाषा निकष- अक्षर,शब्द,वाक्य,परिच्छेद,गोष्ट इ.गणित निकष- संख्या, संख्याज्ञान,संख्यावरील क्रिया)

  गटनिहाय वर्गीकरण :-
   गट-1                          उच्च क्षमताप्राप्त विदयार्थी.
   गट-2                          काही क्षमताप्राप्त विदयार्थी.
   गट-3                          काही दुस-या क्षमताप्राप्त विदयार्थी.
   गट-4                          क्षमता प्राप्तीमध्ये कच्चे विदयार्थी.
   गट-5                          क्षमता संपादणूकीमध्ये कच्चे विदयार्थी.

   गट 1 आणि गट 4               यात गट 1 मधील विदयार्थी गट 4 मधील
   यांचे सहअध्ययन                 विदयार्थ्यांना अध्ययनास मदत करतील.
   गट 2 आणि गट 3               क्षमता संपादनातील त्रुटी विदयार्थी एकमेकांच्या
   यांचे सहअध्ययन                 सहाय्याने दूर करतील.
   गट 5                          शिक्षक स्वतः विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
 
¤  परीपाठानंतर भाषा व गणित विषयाचे अध्यापन करणे.
धन्यवाद !!!

No comments:

Post a Comment