Pages

गणित विकास

 ¤ गणित विकास ¤
 
           व्यावहारिक उपयुक्तता आणि तर्कसंगत विचारसरणी व गणन विकसित करणारे स्वरूप या वैशिष्टयांमुळे गणित विषयाला जगभराच्या शालेय अभ्यासक्रमात महत्वाचे स्थान आहे. लेखन ,वाचन,संभाषण चातुर्य याबरोबरच यशस्वी जीवनासाठी व्यवहार ज्ञानही तितकेच महत्वाचे आहे.दैनंदिन कामकाज/व्यवहार, व्यापार-व्यवसाय,कृषी इत्यादिंमध्ये गणिताचा वापर करता येणे हे सर्वसामान्य उ'ष्टि आहे. शालेय गणिताच्या अभ्यासाने अनेक विषयांच्या प्रगत अभ्यासाची संधी निर्माण होऊ शकते. याव्यतिरिक्त गणिताच्या अभ्यासाने चिकित्सक विचारशक्तीचा विकास होतो. यासाठीच प्राथमिक स्तरावरच गणिताची मूलभूत कौशल्य संपादन केली (आकलन व उपयोजन पातळीपर्यंत) तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण शून्य टक्कयावर येते. खंडाळा विकास गटात वर्षभर खालील उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.

 ¤ गणित मंडळ स्थापन करून त्रैमासिक कार्यशाळा घेणे.
 ¤ केंद्रस्तरावर शिक्षकांनी तयार केलेल्या गणिती खेळ पुस्तिकेचे विकसन करणे व 
      प्रत्येक वर्गासाठी उपयोग करणे.
 ¤ दररोज परिपाठाच्या वेळी त्या त्या तारखेचा पाढा तयार करणे व सर्वांनी एकत्र 
     गाणे. (पाढयांचे गाणे).
 ¤ प्रत्येक शाळेत गणिती प्रयोगशाळा , प्रत्येक वर्गात गणित कोपरा, गणित पेटी,ज्ञानरचनावाद  अध्ययनासाठी मुबलक साहित्य.
 ¤ गणित अध्ययन अध्यापनासाठी तालुका,केंद्रस्तरीय उद्‌बोधन वर्ग.
 ¤ सर्व शाळांमधून वर्षातून दोनदा बाजार भरविणे.

विविध उपक्रम :-

1)    गणिती खेळ-
2)    उलट क्रमाने संख्या वाचन
3)    कोरी पाटी संकल्पना
4)    रांगोळीतील गणिती कोडे
5)    अंकांची गंमत
6)    सापशिडी
7)     अल्फाबेट/वर्णाक्षरानुसार अंक ओळखणे,बेरीज,वजाबाकी.
8)    अंक टोपली व अक्षर टोपली यांच्या जोडया.
9)    गठ्‌ठे-सुट्‌टे ,दशकांचा तसेच वेगळया निसर्गातील वस्तूचा संग्रह व वर्गीकरण.
    गटातील पाहूणा ओळखणे.  
10)गणिती रांगोळी.          
धन्यवाद !!!
       
                      

No comments:

Post a Comment