Pages

गरुडझेप संकल्पना

Pages

स्पर्धा परीक्षा

                                                                           स्पर्धा परिक्षा

              आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. ग्रामिण भागातील विदयार्थ्याना स्पर्धेत टिकविण्यासाठी त्यांना लहान वयातच स्पर्धा परिक्षेचा परिचय करून देणे आवश्यक आहे. आज उच्च पदावर विराजमान अधिकाऱ्यांचा परिचय करुन घेतला तर 90 टक्के अधिकार्यां नी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेललेले आहे.जि.प.प्राथमिक शाळेमध्ये स्पर्धा परिक्षेची ओळख व्हावी म्हणून जवाहर नवोदय विदयालय प्रवेश परिक्षा,शिष्यवृत्ती परिक्षा (5 वी व 8 वी) ,प्रज्ञाशेाध परिक्षा (4 थी व 7 वी ), यासारख्या परिक्षेची तयारी करून घेतली जाते.
    डॉ.ए.पी.जे. कलाम सांगतात “आयुष्यात यशस्वी होणेसाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यापैकी पहिली मानसाला इच्छा हवी,महत्वकांशा हवी दुसरी म्हणजे तिचा ध्यास घ्यायला हवा आणि तीसरी ती पूर्ण होईल असा दृढविश्वास हवा.” 
 
    तालुक्यात वर्षभर स्पर्धा परिक्षा तयारीसाठी खालील उपक्रम राबविले जातील.   
                   
 1)    स्पर्धा परीक्षा संदर्भात तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करणे.
2)    प्रश्नपेढी तयार करणे.
3)    जादा तासिका नियोजन,शाळा भरणेपूर्वी व शाळा सुटल्यानंतर नियोजनानुसार.
4)    भाषा-व्याकरणावर आधारीत प्रश्नांचा सराव.शाब्दीक कोडी,भाषिक खेळ,शब्द भेंडया इ.सराव.
5)    परिपाठात -सामान्यज्ञानावर आधारीत किमान दररोज 5 प्रश्न विचारुन स्पष्टीकरण देणे.
6)    दररोज मधल्या सुटीत वर्तमानपत्र  वाचन - मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्र.
7)    विषयनिहाय प्रश्नपेढी – पाठ शिकवून झाल्यानंतर प्रश्नोत्तरांचा सराव घेणे व चाचणी घेणे.
8)    पाठावर,घटकांवर आधारित स्वतःविदयार्थ्यांना प्रश्न निर्मिती करण्यास सांगणे.
9)    डिसेबर अखेर तयारी व  प्रश्नपत्रिका सोडविण्याचा जास्तीतजास्त सराव घेणे.
खंडाळा तालुकास्तरीय परीक्षा आयोजन.
धन्यवाद !!!

1 comment:

  1. खूपच छान व नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत
    आपला आम्हाला अभिमान आहे

    ReplyDelete