Pages

गरुडझेप संकल्पना

Pages

आदर्श परिपाठ



आदर्श परिपाठ
                जर मुलांना शाळा हे दुसरे घर वाटले तर ती मोकळेपणे वावरणार आहेत. यासाठी घराप्रमाणेच आम्ही शाळेच्या स्वच्छतेवर भर देणार आहोत. सर्व शाळा एका रंगात रंगणार आहेत व दररोज शिक्षक,विदयार्थी शाळा स्वच्छता करणार आहेत. प्रसन्न स्वच्छ परिसर ,पोषक आहार ,मुलांना स्वच्छतेच्या सवयी,मैदानावरील दंगामस्ती, यामूळे निरोगी शरीर आणि मन असणारी पिढी निश्चित घडणार आहे. परिपाठ विदयार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी महत्वाची भूमिका बजावतो. परिपाठातून शाळेची सुंदरता व शिस्तबध्दता लक्षात येते. विदयार्थ्यांच्या जीवनात हळूहळू अमूलाग्र बदल घडतो  भविष्यात संस्कार व मुल्य यांची शिदोरी आदर्श परिपाठाने विद्यार्थ्यांना मिळते. हा नाविण्यपूर्ण कसा करता येईल यादृष्टीने पुढील प्रकारचे नियोजन शाळास्तरावर करून अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
रोजच्या परिपाठाचा क्रम खालीलप्रमाणे असेल.
1) राष्ट्रगीत
 2) प्रतिज्ञा
3) संविधान
4) श्लोक
5) प्रार्थना
6) पंचांग
7) बोधकथा
8) सामान्यज्ञान -2 प्रश्न व अर्थ/इतिहासासह स्पष्टीकरण (शिक्षकाद्‌वारा)
9) भाषा व इंग्रजी - 2 प्रश्न व अर्थ/इतिहासासह स्पष्टीकरण (शिक्षकाद्‌वारा)
10) स्फूर्तीगीत
11) वाढदिवस/विदयार्थी सन्मान इ.
12) भजन
13) पसायदान
14) भस्त्रिका - प्राणायाम,ओंकार व रामध्यान.
             

साप्ताहिक शालेय परिपाठ नियोजन तक्ता

अ.क्र.
वार
प्रतिज्ञा
श्लोक
प्रार्थना
स्फूर्तीगीत
भजन
1
सोमवार
मराठी
कैलासराणा

देवा हो देवा
हा देश माझा
ओम नमः शिवाय
2
मंगळवार
मराठी
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
किती सुंदर सुंदर हे जग ज्याने निर्मियले
हे शिव सुंदर समरशालिनी
रघुपती राघव राजा राम
3
बुधवार
हिंदी
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ

इतनी शक्ती हमे देना दाता
हिंद देश के निवासी सभी जन एक है
विठ्‌ठल विठ्‌ठल विठ्‌ठला हरि ओम विठ्‌ठला
4
गुरूवार
हिंदी

गुरूर ब्रम्हा गुरूर विष्णू

हम को मन की शकती देना
चला चला गाऊ चला आनंदाचे गाणे
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
5
शुक्रवार
इंग्रजी
सदा सर्वदा योग तुझा घडावा

God is One
O India we shall overcome
गायत्रीमंत्र
6
शनिवार
इंग्रजी
मनोजवं मारूत तुल्य वेगम जितेंद्रियम

आस हि तुझी फार लागली
भारतभुची आम्ही लेकरे
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला

                                                                         सायंप्रार्थना

             मूल घरातून बाहेर पडतानाच त्याला घराची ओढ वाटत राहते. अगदी शाळेबाबतीतही दिवस भरातील उत्साहवर्धक घटना व सायंप्राथर्ना लक्षवेधी असेल तर शाळेचीही ओढ वाटणार आहे. यासाठी शाळा सुटताना मैदानात सर्व विदयार्थी एकत्र आले त्यांनी दिवसभराच्या गमतीजमती एकमेकांना सांगितल्या त्यांना त्या दिवशीचा आदर्श विदयार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सांगितला.प्रत्येक वयोगटातील एका विद्यार्थ्यांनी  आपल्या वर्गात घडलेली वैशिष्टपूर्ण गोष्ट सर्वांना सांगितली तर त्या विद्यार्थ्यांबरोबर  इतरानांही आनंद घेता येणार आहे.दुसरा दिवस एखादा विशेष दिवस असेल शाळेसाठी एखादा समान उपक्रम घ्यायचा असेल त्याबद्दल  शिक्षकांनी माहिती देऊन तयारीने यायला सांगितले तर मुलांचा उत्साह वाढतो. मूले घरी जाताना त्यांना वेगवेगळया पध्दतीने निरोप दिला तरीही मुले आनंदाने घरी जातात व दुस-या दिवशी तितक्याच किंगहूना जास्त आनंदाने शाळेत येतात. याबरोबरच दररोज वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या गायनाने मातृभूमीबद्दलचे प्रेम वाढणार आहे.
धन्यवाद !!!

No comments:

Post a Comment